loader image

योगासन केंद्र

संस्थेत २००७ पासून योग वर्गाचे आयोजन केले जात आहे.

सूक्ष्मव्यायाम (संधी चालन) एरोबिक्स, सूर्यनमस्कार, शुद्धिक्रिया, आसनं, बंध, मुद्रा, प्राणायाम, ध्यान, शवासन हे प्रकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जातात.

ह्या प्रशिक्षण वर्गांमुळे शिबिरातील साधकांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर खूपच चांगला परिणाम झाल्याचे आढळले आहे. शिबिरातील साधकांचे चापल्य तर सुधारतेच पण त्याच जोडीला हे सर्व प्रकार हृदयरोगी, मधुमेह रोगी, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, गुडघे दुखीचे रुग्ण ह्यांच्यासाठी खूपच गुणकारी ठरत आहे.

E
गेल्या १४ वर्षात हजाराहून अधिक साधकांनी ह्याचा लाभ घेतला आहे.
E
सोमवार ते शनिवार सकाळी ६:३० ते ७:३० ह्या वेळात हे वर्ग भरतात.
E
संपर्कासाठी : श्री. मधुसूदन साठे - ९८३३६९२३६२