॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
संस्थेचे उपक्रम
'निरामय' उपक्रम
ह्या उपक्रमांअंतर्गत मंडळाच्या प्रसिद्धीमाध्यमांवर (युट्युब) नामांकित, अनुभवी डॉक्टर्स आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं देतील. वैद्यक शास्त्रातील जागरूकता हाच उद्देश.
चैतन्य फिज़िओथेरपी केंद्र
योगासन केंद्र
कला-क्रीडा प्रशिक्षण वर्ग
कर्करोग्यांसाठी योगासनं व जीवनशैली मार्गदर्शन
व्यक्तिमत्त्व विकास
आर्थिक किंवा अन्य काही अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करू न शकणार्या मुलांना स्वावलंबी जीवनासाठी सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येते.
समाजोपयोगी कार्य
ग्रामीण भागात बंधारा बांधणे आणि 35 एकर जमिनीसाठी सौर उर्जेवर चालणारी ठिबक सिंचन योजना, यासारख्या समाजाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभदायक योजनांत योगदान.
अभ्यासिका
शांतपणे अभ्यास करू इच्छिणाऱ्या पार्ले आणि आसपासच्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना रात्री आठ ते दहा या वेळात महिना तीस रुपये इतक्या अल्प शुल्कात अभ्यासिका उपलब्ध.
वधू-वर सूचक उपक्रम
अुत्कर्ष मंडळात वधू वर सूचक मंडळ चालवले जाते.
रक्तदान शिबीर
“रक्तदान म्हणजे सर्वोत्तम दान” या उक्तीचा ध्यास घेऊन अनेक वर्षे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत.
व्याख्यानमाला
मंडळामध्ये वेळोवेळी अभ्यासपूर्ण, वैचारिक विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात.
कराटे वर्ग
गेली अनेक वर्षे “कराटे” या स्वंसरक्षणाच्या कौशल्याचे मुलांना शिक्षण देण्यासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
रांगोळी वर्ग
कला-कौशल्याच्या विकासासाठी श्रीमती किशोरी परुळेकर संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण वर्ग मोफत चालवीत आहेत.
ग्राहक तक्रार निवारण केंद्र
ग्राहक मंचातर्फे ग्राहकांना मोफत कायदेशीर सल्ला दिला जातो.
महिलांसाठी विशेष उपक्रम
कला-कौशल्याच्या विकासासाठी श्रीमती किशोरी परुळेकर संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण वर्ग चालवीत आहेत. तसंच महिलांसाठी स्व-संरक्षण शिबीरही राबविलं जातं.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)