loader image

Ein Ghostwriter ist ein Schriftsteller, der im Namen seines Kunden schriftliche Inhalte bereitstellt. Dies kann Artikel, eBooks und Blog -Beiträge umfassen.Ein Ghostwriter ist eine hervorragende ghostwriter Ressource für Menschen, die schreiben möchten, aber keine Zeit oder Fähigkeiten haben. Sie können hochwertiges Schreiben für eine Vielzahl von Projekten und Themen bieten.

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

केशवसृष्टीच्या ग्रामविकास योजना

केशवसृष्टीच्या ग्रामविकास योजनेअंतर्गत ‘साई निशेत ह्या गावाचा विकास’ ह्या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक ३ ऑक्टेाबर २०२१ रोजी झाला. अुत्कर्ष मंडळ विलेपारले यांनी या कामांची जबाबदारी घेतली आहे. मंडळाचे सभासद ह्या प्रसंगी उपस्थित होते. त्या दिवशी ग्रामस्थांनी मोठ्या आपुलकीने आणि वाजतगाजत मंडळाच्या सभासदांचे स्वागत केले.त्यानंतर गावाकडील प्रथेप्रमाणे पारंपारीक नृत्य सादर केले गेले. समाजमंदिराच्या हॅालमध्ये गावकरी मोठ्या संख्येने जमले होते.केशवसृष्टीच्या प्रतिनिधीने ग्रामविकास योजनेबद्दल आणि साई निशेत गावाबद्दल माहीती दिली. त्यानंतर अुत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला संबोधित केले आणि नजिकच्या काळात कोणती कामे गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्याचे योजिले आहे हे थोडक्यात सांगितले. गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षण, आरोग्य , शेती विषयी सुधारणा आणि स्वच्छता या विषयांवर पुढील काळात भर द्यावा लागेल असे मत सभेत मांडण्यात आले.

त्या दिवशी गावकर्‍यांसाठी मंडळाने विविध विषयांवरील पुसतके देऊन वाचनालय सुरू केले आणि एक संगणकही गावास दिला. त्या दिवशी गावात खूप उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाची सांगतां ग्रामस्थांनी आयोजलेल्या चवदार भोजनाने झाली.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)