loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

ब्राईट फ्युचर उद्घाटन सोहळा

शालेय शिक्षण घेताना येणार्‍या आर्थिक किंवा इतर प्रकारच्या अडचणींमुळे काही मुलांची शिक्षणाची स्वप्ने पुरी होत नाहीत. कदाचित त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही.

“New Resolution India” अश्या मुलांसाठी बरेच कार्य करते. अशा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘युथ डेवलपमेंट ट्रेनिंग सेंटर’ या माध्यमातून ही संस्था काम करते.

आपल्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी या संस्थेचा उपयोग व्हावा तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमधील मुलांना, तरुणांना याचा लाभ मिळावा या दृष्टीने अुत्कर्ष मंडळाने या संस्थेचे एक केंद्र मंडळाच्या तळघरात सुरू करण्याचा निर्णय घेतला.

२९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी या केंद्राचा उद्घाटन समारंभ झाला. ब्राइट फ्युचर संस्थेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी याबरोबरच अुत्कर्ष मंडळातील कार्यकारी मंडळीही उपस्थित होती.

प्रातिनिधिक स्वरूपाने सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)