loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

संस्थापकांचे मनोगत

अुत्कर्ष मंडळ विलेपारले या संस्थेची स्थापना, रविवार दि. ६ डिसेंबर १९६४ रोजी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ या संस्थेच्या टुमदार इमारतीत झाली. ह्या एका विधानामागे अनेकांची तळमळ आणि कष्ट अध्याहृत आहेत. श्री. अशोक सिताराम जोशी हे अुत्कर्ष मंडळाचे संस्थापक कार्यवाह.

१९६४ च्या सुमारास विलेपारले एक स्वयंपूर्ण उपनगर होते. बालवाडी ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षणाची सोय होती आणि सहकारी सदनिकांमुळे मध्यम आणि उच्च मध्यमवर्गातील बरीच मंडळी इथे स्थायिक होत होती, त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार घेऊन मार्गक्रमण करणारी बरीच मंडळी होती. पार्ले टिळक विद्यालय, लोकमान्य सेवा संघ, महिला संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, गोमांतक सेवा संघ या संस्थांमध्ये आणखी एका संस्थेची भर पडली आणि शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक संस्थांचे जाळेच निर्माण झाले.

श्री. मधुकर महाजन, श्री. अनंतराव करंबेळकर, ॲडव्होकेट म. द. रानडे, श्री. दत्तोपंत गोगटे, श्री. आबा दामले ही आरंभीची काही मुख्य नावे. संस्थेसाठी पैसा तर उपलब्ध नव्हता. श्रीमान बाळासाहेब गोखले, मालक विष्णू स्टोअर्स, यांनी सुरुवातीचे पैसे दिले. पैसा उभा करण्यासाठी फेब्रुवारी १९६५ साली नाट्योत्सव करण्याचे ठरले. नाट्योत्सव संपन्न झाला आणि बाळासाहेबांचे पैसे परत करून काही हजार रुपये संस्थेच्या गाठी जमा झाले. प्राध्यापक फडणीस यांनी मंडळाची घटना लिहून दिली. संस्था नोंदणीकृत करून घेतली.

यावेळी कार्यकर्त्यांपैकी कोणाकडेही कोणतेही वाहन नव्हते व दूरध्वनीही नव्हते. काम करताना संघकार्य आणि संस्थाकार्य यातील मूलभूत फरक कार्यकर्त्यांच्या ठळकपणे लक्षात आला. संघ म्हणजे आज्ञा आणि संस्था म्हणजे विनंती. संघ म्हणजे शिस्त आणि संस्था म्हणजे संयम. संस्थेत सर्वांना बरोबर घेऊन काम पुढे नेण्याची गरज लक्षात आली. संस्थेत एकमताने निर्णय घेतले जाऊ लागले आणि सर्व एकदिलाने संस्थेच्या विस्ताराकरिता झटू लागले.

या सर्व संस्थापक पदाधिकारी व्यक्तींनी पुढील अनेक वर्षे कार्य केले. आणि नंतरच्या तरुण पिढीच्या कार्यकर्त्यांना जोडून घेऊन, त्यांच्यावर कार्यभार सोपवून, मंडळाची दमदार उभारणी केली. नवीन व्यक्तिंनीही आधीच्या कार्यकर्त्यांचे विचार, मूल्ये अबाधित ठेवीत वाटचाल चालू ठेवली. आज या वाटेवर “उषा जामनेरकर मूकध्वनी शाळा” हा मुख्य उपक्रम “टेक महिंद्र फाऊंडेशन” चे सहाय्य घेत बहरत आहे. याचबरोबर इतरही उपक्रम चालू आहेतच.

या वाटचालीची सविस्तर माहिती मंडळाच्या इतिहासात नोंदली आहे.

संस्थापक कार्यवाह श्री.अशोक जोशी यांचे मनोगत

अुत्कर्ष मंडळ विलेपारले या संस्थेची स्थापना, रविवार दि. ६ डिसेंबर १९६४ रोजी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ या संस्थेच्या टुमदार इमारतीत झाली. ह्या एका विधानामागे अनेकांची तळमळ आणि कष्ट अध्याहृत आहेत.

सुरुवातीच्या वर्षी खालील व्यक्तिंनी पदभार सांभाळला.

अध्यक्ष

ॲडव्होकेट म. द. रानडे

कार्यवाह

श्री. अशोक सीताराम जोशी

उपाध्यक्ष

सौ. निर्मला शेंडे

कोषाध्यक्ष

श्री. अ सी करंबेळकर

खालील व्यक्तिंनी सुरुवातीच्या काळात कार्यरत राहून बहुमोल योगदान दिले आहे.

श्री. ल. वा. बोडस

श्री. श्री. वा. फडणीस

श्री. पी. व्ही. परांजपे

श्री. चिं. वि. गोगटे

श्री. पां. के. दामले

श्री. श्रीकृष्ण श. बापट

श्रीमती नलिनी महाजन

श्रीमती सुधा चितळे

श्री. मनोहर दाते

श्री. म. द. लिमये

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)