भरतनाट्यम् वर्ग
मुंबईतील जुहू येथील नालंदा नृत्य अकादमीशी संलग्न ७ वर्षांचा भरतनाट्यम् या नृत्य प्रकाराचा अभ्यासक्रम संस्थेत उपलब्ध आहे. २००७ पासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. हा अभ्यासक्रम अगदी पारंपरिक पद्धतीने गुरु-शिष्य परंपरेचं पूर्ण पालन करत शिकवला जातो. नृत्यसाधना आणि त्या मागची सैद्धांतिक बैठकीचे योग्य शिक्षण ह्यांचा उत्कृष्ट मेळ संस्थेतील अभ्यासक्रमात साधला आहे.
सध्या संस्थेत ५७ विद्यार्थी/विद्यार्थिनी भरतनाट्यम् शिकत आहेत
दर आठवड्याला गुरुवार आणि शुक्रवारी सायंकाळी ५:३० ते ८:३० ह्या कालावधीत हे वर्ग होतात
ह्या वर्गांच्या माहितीसाठी श्रीमती रिद्धी गौरव ह्यांच्याशी संपर्क साधू शकता । संपर्क : ९३२३९८०४७१
सुगम संगीत वर्ग
२०११ पासून अुत्कर्ष मंडळ विलेपारले येथे वर्ग सुरु आहेत. भावगीत, भक्तिगीत, अभंग, गझल, उपशास्त्रीय संगीत हे सर्व प्रकार शिकवले जातात.प्रत्येक बॅचमधे ५ या प्रमाणे सध्या २० विद्यार्थी शिकत आहेत.
वेळ : सायंकाळी ५ ते ८
वार : सोमवार, बुधवार, गुरुवार
संचालक - सौ.स्वाती जोशी | मोबाईल क्र . ९८३३६८३८९३
सरस्वती गुरुकुल सतारवादन विद्यालय
गुरुकुलात सतारवादनाचे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित शिक्षण दिले जाते. विविध राग शिकवले जातात. आकाशवाणी मान्यताप्राप्त A grade चे राष्ट्रीय सतारवादक.
दर मंगळवार आणि शुक्रवार
सायंकाळी ७ ते ९
संचालक : पं. शशांक कट्टी | मोबाईल क्र. - ९८२००४६९२०
बुद्धिबळाचे वर्ग आणि स्पर्धा
बुद्धिबळाचे वर्ग व स्पर्धा श्री. रघुनंदन गोखले ह्यांच्यासारख्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जात होत्या.