॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
सुवर्ण महोत्सव अुत्कर्षाचा : वर्ष १९६४ ते २०१४
सुवर्णमहोत्सवी वर्षात मंडळाने आयोजित केलेले विशेष कार्यक्रम
सुवर्ण महोत्सवी वर्षाचा पहिला कार्यक्रम रविवार दि. १३ एप्रिल २०१४ रोजी झाला. स्वप्नदृष्ट्या महापुरुषाचा परिस स्पर्श झाल्यावर, चंद्रगुप्ताचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य बनला. राष्ट्राला सर्वोच्च मानणाऱ्या कौटिल्याला अभिवादन करणारे ज्वलंत ऐतिहासिक हिंदी नाटक म्हणजे ‘चाणक्य’. हे नाटक श्री. मनोज जोशी यांनी दिग्दर्शित केले होते. नाटकात चाणक्य ही मुख्य भूमिका त्यांनीच केली होती. या नाटकाचे लेखक आहेत श्री. मिहिर भुता.
रविवार दि. २७ एप्रिल २०१४ रोजी डॉ. हिमाली भट यांनी मोफत होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिर घेतले.
१० मे २०१४ रोजी ‘कथा पराक्रमाच्या, गाथा स्वातंत्र्योत्तर संग्रामाच्या’ हा वीरमाता अनुराधा गोरे लिखित कार्यक्रम श्री. अजितेम जोशी यांनी संपर्क संयोजन केलेल्या कलाकारांनी सादर केला. हा कार्यक्रम लोकमान्य सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने सादर झाला.
रविवार दि. २० एप्रिल २०१४ आणि रविवार दि. ३ ऑगस्ट २०१४ रोजी पार्ल्यातील अनेक संघटनांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली.
रविवार दि. ३ ऑगस्ट २०१४ रोजी ‘डॉ. सदानंद मोरे’ यांचे ‘लोकमान्य आणि महात्मा’ या विषयावर व्याख्यान झाले. श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था आणि श्री चार्रिटेबल ट्रस्ट विलेपार्ले यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
“साने केअर, माधवबाग” यांच्या सहकार्याने ‘आरोग्य हृदयसंपदा’ हा आरोग्यविषयक कार्यक्रम शनिवार दि. १३ सप्टेंबर २०१४ रोजी संपन्न झाला.
वैद्यराज व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने ‘हृदयरोग परिसंवाद’ वैद्य नितीन कामत (एम.डी.आयुर्वेद), डॉ. मंदार नायर (एम.डी.होमिओपॅथी), डॉ. शेखर आंबर्डेकर (एम.डी.हृदयरोग तज्ञ) यांनी आपापल्या पद्धतीतील निदान आणि चिकित्सा वैशिष्ट्ये या विषयी श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
‘जनसेवा समिती, विलेपारले’ यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने कै. कॅ.विनायक गोरे स्मृतिदिन शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०१४ रोजी संपन्न झाला. वीरमाता अनुराधा गोरे लिखित “शौर्य कथा भाग दोन” या पुस्तकाचे मेजर डॉ. मनिष खंदारे, आय. एन. एस. अश्विनी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०१४ रोजी अुत्कर्ष मंडळ विलेपारले आणि केशवसृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रतिभा आठवले यांचा ‘केशवसृष्टी पुरस्कार’ प्रदान समारंभ झाला डेन्टिस्ट डॉ. प्रतिभा आठवले यांनी पूर्वांचलातील त्यांच्या कामाचे दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केले.
दिनांक ८ डिसेंबर २०१४ रोजी श्री व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफले श्री. सुनील देवधर यांनी. त्यांचा विषय होता “पूर्वांचलाची हाक – तरुणांना आव्हान.’
व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफले गेले दि. ९ डिसेंबर २०१४ रोजी मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर यांनी विचार मांडले ते “भगवद्गीता आणि सामाजिकता” या संदर्भात.
दिनांक १० डिसेंबर २०१४ रोजी समतोल फाऊंडेशनचे संस्थापक श्री चारुदत्त वैद्य आणि श्री. सुशील जाजू यांनी घरातून पळून आलेल्या १८ मुलांचे त्यांच्या पालकांकडे हस्तांतरण केले.
दिनांक ११ डिसेंबर २०१४ रोजी “मंगल झाली मंगळयात्रा” या विषयावर माहिती आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. वक्ते होते प्रा. मोहनराव आपटे.
दिनांक १३ डिसेंबर २०१४ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ साजरा झाला. अध्यक्ष होते लातूरचे पद्मश्री डॉ. अशोकराव कुकडे. त्यांच्या हस्ते याच दिवशी मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)