॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून साकारलेला उपक्रम
ब्राईट फ्युचर (Bright Future)
या संस्थेची स्थापना २००९ साली झाली. आणि २०१४ पासून पूर्ण स्वरूपात कार्यरत आहे. आजपर्यंत संस्थेची ९ केंद्रे आहेत. १४ शाळा, १७ समुदाय केंद्रे या माध्यमातून ही संस्था १३ हजारांवर मुलांसोबत यशस्वीपणे काम करीत आहे.
आपल्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी या संस्थेचा उपयोग व्हावा तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमधील मुलांना, तरुणांना याचा लाभ मिळावा या दृष्टीने अुत्कर्ष मंडळाने या संस्थेचे एक केंद्र मंडळाच्या जागेत सुरू करण्याचा निर्णय घेतला. तळघरातील जागा त्यांना देण्यात आली आहे. टेक् महिंद्र ही कंपनी आपल्या शाळेप्रमाणेच याही संस्थेचा आधारस्तंभ आहे. आर्थिक व्यवस्था त्यांच्यातर्फेच करण्यात आली आहे. आपल्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी खास शिक्षकही संस्थेने नेमले आहेत.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)