loader image

ग्राम विकास

केशव सृष्टी ह्या सामाजिक संस्थेने त्यांच्या ग्रामविकास कार्यक्रमाच्या अंतर्गत वाडपाडा तळवली गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी वर्षभर पाणी उपलब्ध व्हावं ह्यासाठी जलसिंचनाचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्या प्रकल्पाला संस्थेने २०१९-२० ह्या आर्थिक वर्षात वर्षांत तीन लाख सात हजारांचा निधी दिला.

ठिबक सिंचन प्रकल्प

२०१९-२० ह्या आर्थिक वर्षात केशव सृष्टी ह्या सामाजिक संस्थेच्याच वाडा तालुक्यातील डोंगरीपाडा गावातील ठिबकसिंचन प्रकल्पाला देखील संस्थेने सहा लाख एक हजार रुपयांचा निधी दिला. ह्या प्रकल्पामुळे गावातील ३२ शेतकरी कुटुंब वर्षाला २ पिके सहज घेऊ शकतील.

डायलिसिस

‘नाना पालकर स्मृती समितीला’ एक नवीन डायलिसिस उपकरण (२०१८-२०१९) या वर्षात अुत्कर्ष मंडळातर्फे भेट देण्यात आले.

श्री. बिमल केडिया. मंडळाचे आदरणीय विश्वस्त.

मंडळाच्या आम्हा कार्यकर्त्यांना उत्साह आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व. ‘लक्ष्य ७५ गावांच्या विकासाचे’ या मुलाखतीत त्यांनी जी ‘Urban to Rural’ ची कल्पना मांडली आहे ती आपणा सर्वांनाच नवी द्रुष्टी देऊन जाईल.