॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
संविधान दिन
कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे श्री. मिलिंद करमरकर यांनी वाचन केले. अुत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, मंडळाच्या मूक-ध्वनी विद्यालयाचा शिक्षक वर्ग तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, प्रबोधन मंच अशा अनेक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पार्लेकर नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. धनंजय गोखले यांनी भूषविले. कार्यवाह श्री. अजय सप्रे ह्यांनी सर्वांचे आभार मानले.
सकाळी अुत्कर्ष मंडळ संचालित स्व. सौ. उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालयात संविधान दिन साजरा केला गेला.
शाळेतील सर्व मुलांनी भारतीय संविधानासंबंधी वेगवेगळी चित्रे, पोस्टर, घोषवाक्य व रांगोळ्या काढल्या. शिक्षकांनी मुलांना भारतीय संविधान संबंधी महत्व समजून सांगितले.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)