कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी
प्रदूषण, चुकीच्या आहारपद्धती, विस्कटलेली जीवनशैली, आणि ताणतणाव ह्यामुळे कॅन्सर हा आजार झपाट्याने पसरू लागला आहे. ही चिंतेची बाब आहे म्हणूनच कॅन्सरवर मात करण्यासाठी आणि एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठाणे येथील श्री अंबिका योग कुटीर ह्यांच्या सोबत संस्थेने ‘कर्करोग निवारण सहाय्य केंद्र’ २८ सप्टेंबर २०१५ ला सुरु केले आहे.
श्री अंबिका योग कुटिरचा ह्या क्षेत्रातील अनुभव जवळपास ५५ वर्षांचा आहे आणि त्याचा निश्चित फायदा संस्थेला आणि केंद्रात आलेल्या रुग्णांना झाला आहे.
१६० हून अधिक रुग्णांना ह्या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
हा उपक्रम मोफत उपलब्ध आहे.
ह्या केंद्रामार्फत खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाते
१. कर्करोगाच्या दरम्यान आणि तो बरा झाल्यावर काय आणि कशी काळजी घ्यावी.
२. योग्य आहार म्हणजे काय आणि किती घ्यावा.
३. कॅन्सरवर मात करताना ज्या आधुनिक चिकित्सा पद्धती वापरल्या जातात त्याचे होणारे दुष्परिणाम कसे कमी करावेत.
४. कॅन्सरवर मात करण्यासाठी एक संवाद गटाची स्थापना.
५. ह्या संवाद गटांमार्फत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांचं मनोधैर्य वाढवणे.
६. योग आणि प्राणायम ह्यांचा वापर कॅन्सर निवारणासाठी कसा होऊ शकतो.
७. योग्य पोषणमूल्य असलेली औषधे रास्त भावात उपलब्ध करून देणे.
श्री अंबिका योग कुटीर मधील खालील शिक्षक आपल्या संस्थेतील कर्करोग निवारण सहाय्य केंद्राशी संलग्न आहेत.
सतीश कोळवणकर :- ९८६९०८८४६३शीतल कोळवणकर – ९८२००६९२२२
उदय घाणेकर – ९८२०८५६२८९
रत्नप्रभा जोशी – ९८१९८२४५४३
केतन शाह – ९८३३२१९४६७
प्रगती आचरेकर – ९८६९६३९३५५
कर्करोग निवारण सहाय्य केंद्राचे काम नक्की काय आहे आणि एकूणच कर्करोगाविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी ह्या उद्देशाने १७ जून २०१७ रोजी पुण्यातील वाघोली येथील ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटर’ ह्यांच्या सहाय्याने डॉ सरदेशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अुत्कर्ष मंडळात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात ३८ रुग्णांची स्तनाच्या कर्करोगाची चाचणी केली तर १४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आणि नंतर इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटर आणि श्री अंबिका योग कुटीर मधील तज्ज्ञांनी कॅन्सरचा विळखा कसा घातक होत चालला आहे आणि ह्यावर कशी मात करता येत आहे ह्या विषयी मार्गदर्शन केले.