loader image

व्यक्तिमत्त्व विकास

शालेय शिक्षण घेताना येणार्‍या आर्थिक किंवा इतर प्रकारच्या अडचणींमुळे काही मुलांची शिक्षणाची स्वप्ने पुरी होत नाहीत. त्यांना मार्गदर्शन नसल्याने ही मुले कुवत असून देखिल आयुष्यात आपली स्वप्ने साकार करू शकत नाहीत. निराशेमुळे क्वचित वाईट मार्गालाही लागतात. अशा मुलांच्या पालकांसमोर मोठी समस्या उभी रहाते.

या संस्थेची स्थापना २००९ साली झाली. आणि २०१४ पासून पूर्ण स्वरूपात चालविली जात आहे. आजपर्यंत तशी ९ सेंटर्स आहेत. १४ शाळा, १७ समुदाय केंद्रे या माध्यमातून ही संस्था १३ हजारांवर मुलांसोबत यशस्वीपणे काम करीत आहे.

अुत्कर्ष मंडळ, टेक महिंद्र आणि न्यू रिझोल्यूशन इंडिया ह्यांच्या सोबत हा नवीन प्रकल्प सुरु केला आहे.

ह्यात दोन पाठ्यक्रम (कोर्सेस) चालवले जातात. पहिला कोर्स हा किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी ज्याचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. उत्तम मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली हा कोर्स चालवला जातो. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी ह्यासाठी न्यू इंडिया रिझोल्युशन ही सहभागी संस्था मदत करते.

कोर्सचं स्वरूप आणि तपशील : Information Technology enabled Service(ITeS)

संवाद कौशल्य, इंग्रजी भाषा संवाद कौशल्य, माहिती आणि तंत्रज्ञान, व्यक्तिमत्व विकास, जीवन कौशल्य विकास, मुलाखतीची तयारी कशी करावी अशा अनेक विषयांची तयारी ह्या कोर्समध्ये करून घेतली जाते.

बँकिंग

ह्या कोर्समध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण दिले जातेच पण त्याच सोबत बँकिंग क्षेत्रातील बॅक ऑफिस कसे चालते आणि तिथे नोकरी मिळवण्यासाठी आणि त्या नोकरीत स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर भर असतो.