loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

रक्तदान शिबीर

देशातील कोरोनाचा वाढता कोरोना संसर्ग पाहता कोव्हीड रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे रक्तदात्यांनी पुढे यावं म्हणून सातत्याने आवाहन केलं जात आहे. त्याअनुषंगाने मंडळातर्फे एक सामाजिक उपक्रम म्हणून विलेपार्ले पोलीस स्थानक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर राबविण्यात येणार आहे. कृपया आपण रक्तदानासाठी पुढे यावं. तुमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब कुणासाठी तरी संजीवनी ठरू शकतो.

दिनांक : ९ मे २०२१
वेळ : सकाळी ८ वा. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
स्थळ : अुत्कर्ष मंडळ – शानभाग सभागृह, विलेपारले पूर्व, मुंबई.

राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी विलेपारले येथील १५ सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन लोकमान्य सेवा संघ येथे ‘एकता रक्तदान शिबिराचे’आयोजन केले होते. सायन रुग्णालयाने आपला, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी लोकांचा संच आणि साहित्य उपलब्ध करून दिले.ठिकठिकाणी जाहिरात फलक (फ्लेक्स )लावून लोकांना माहिती करून देण्यातआली. लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या ग्राहक पेठेतही स्वयंसेवक लोकांना या दिवसाची माहिती करून देत,त्यांच्याकडून फॉर्म्सही भरून घेत होते. सगळ्यांनी आपल्या व्हाट्सअप वरून प्रचार केला.एकूण ९१ व्यक्तींनी रक्तदान केले. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व संस्थांच्या स्वयंसेवकांनी आपला सहभाग दिला आणि रक्तदान शिबिर यशस्वी केले. रक्तदात्यांना आणि स्वयंसेवकांना सहभागाबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले. सर्व संस्था मिळून रक्तदानाचा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न झाला.

दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१
वेळ : सकाळी ८ वा. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
स्थळ : अुत्कर्ष मंडळ – शानभाग सभागृह, विलेपारले पूर्व, मुंबई.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)