loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

जाहीर आवाहन : ‘आत्मनिर्भर गाव’ समाजोपयोगी उपक्रम

नमस्कार, उत्कर्ष मंडळ विलेपारले या संस्थेने नवीन समाजोपयोगी उपक्रम चालू करण्याचे योजिले आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत वाडा तालुक्यातील निशेत गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. गेली ३ वर्षे, मंडळाने वाडा तालुक्यातील ३ गावांमध्ये पाणी नियोजन प्रकल्प राबवले. ही कामे करत असताना असे लक्षात आले की गावांमध्ये पाण्याखेरीज शिक्षण, स्वच्छता, वीज, आरोग्य, संस्कार, शेती उत्पादन वाढवणे तसेच रोजगार अशा अनेक विषयात गावकऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन तसेच आर्थिक मदतीची गरज आहे.

पहिल्या टप्यात शेतीचे संरक्षण, पीक संख्या वाढवणे, शौचालये, सौर ऊर्जा, संस्कार वर्ग, रस्त्यावरील दिवे, आरोग्य सेवा, संगणक इत्यादी विषय हाताळले जातील. वरील सर्व कामात लागणारे श्रमदान हे गावकरी करणार आहेत. तसेच भविष्यात त्यांना समाजसेवा करण्यास प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भर बनवणे हा हेतूसुद्धा समोर आहे. येत्या ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य गावाला भेट देणार आहेत. ह्या समाजोपयोगी उपक्रमाची सुरुवात ते ग्रामस्थांशी संवाद साधून तसेच गावात पुस्तके आणि संगणक देऊन करणार आहेत. हया सर्व कामांना वर्षभर एवढा कालावधी लागू शकतो. ज्यांना मंडळा बरोबर ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांचे स्वागत आहे. त्याकरिता फक्त आर्थिक मदतच हवी आहे असे नाही. आपल्यापैकी अनेक जण विविध क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार असतील किंवा वरील कामांच्या संदर्भातील तज्ञ व्यक्तींशी काहींचा संपर्क असू शकेल. आपण सल्ला किंवा ओळखीचे योगदान देऊ शकता.

उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर आरोग्य शिबीर भरविण्यात सहभागी होईल तर कोणी शेती किंवा सौर ऊर्जा विषयाचा अभ्यासक असेल तर त्या विषयात मार्गदर्शन देऊ शकेल. बऱ्याच वेळा एखाद्याला समाज कार्यात भाग घ्यायचा असतो पण सुरुवात कोठे आणि कशी करावी असा प्रश्न पडतो. अशा वेळी मंडळ ती व्यक्ती आणि गाव ह्या दोघांमधील दुवा होऊ शकते.

हे निवेदन मंडळाच्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी आहे. तसेच ज्यांना ह्यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा.

कार्यालय (9372421174) किंवा
सं. कार्यवाह श्री. अजय सप्रे (9867508805),
सं. कार्यवाह श्री. विद्याधर चक्रदेव (9820048732)

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)